Ad will apear here
Next
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’
सोलापुरात अनोखा उपक्रम; मुले देणार मतदानाचा संदेश
सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.  

जिल्हा मतदार जागृती आणि शिक्षण समितीची (स्वीप) डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा परिषदेमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत ‘स्वीप’अंतर्गत आतापर्यंत झालेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी करायच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस ‘स्वीप’ समितीचे सहअध्यक्ष अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, संजय मायकलवार, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी अशोग भांजे आदी उपस्थित होते.

मतदान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत (स्वीप) मुले पत्राद्वारे मोठ्यांना मतदान करण्याचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘स्वीप’ समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत सर्व शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे. पत्रावरती विद्यार्थी आपले पालक व कुटुंबीय यांची स्वाक्षरी घेऊन पत्र स्वीप समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

सोलापूर आणि माढा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत सुमारे साठ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतून घंटागाडीद्वारे मतदान जागृती केली जात आहे. आता नवमतदारांनी मतदान करावे यासाठी खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी एफएम रेडिओ जॉकी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सहाय्याने युवकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZKQBY
Similar Posts
मानवी साखळी आणि सायकल रॅलीद्वारे सोलापुरात मतदार जागृती सोलापूर : भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी केलेली साखळी यांच्या माध्यमातून सोलापुरात मतदार जागृती करण्यात आली.
सोलापुरात घंटागाडी करणार मतदारांमध्ये जनजागृती सोलापूर : जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत सुमारे साडेचारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘स्वीप’ उपक्रम राबवला जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात ५६ टक्के मतदान सोलापूर : लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघात ५६ टक्के मतदान झाले. सोनाबाई मोतीराम खरे या ११० वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिला मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language